1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: रियाध , रविवार, 17 जून 2007 (18:44 IST)

आखाती भूमिवरून ईरानवर हल्ला नाही

आखाती देश व आखात सहकार्य परिषद ईरानसोबत असल्याचा उल्लेख करत अमेरिकेस आखाती देशांमधून ईरानवर हल्ला करू दिला जाणार नसल्याचे सौदी अरेबियाने स्पष्ट केले आहे. सौदी अरेबियाचे गृहमंत्री नयेक बिन अब्दुल अझीज यांनी आखाती देश व ईरान एकदुसर्‍यास नुकसानकारक नसुन सहकार्याची भावना व्यक्त केली.

अमेरिकन हल्ल्याने कुणाचाही फायदा नसल्याचे स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत ईरानवर हल्ल्यासाठी आपल्या भूमिचा वापर करू देणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. यासोबतच ईरानमधून सौदी अरेबियाविरूद्ध दहशतवादी कारवाया करणार्‍या दहशतखोरांना आपणांस सोपविण्याची मागणी करतांनाच इराक प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला ईरानला दिला आहे.