बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By महेश जोशी|

विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामागे वर्णद्वेष नाही-ऑस्ट्रेलिया

भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना वर्णद्वेषातून घडलेल्या नसल्याचे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, भारतीय विद्यार्थ्यांनी या हल्ल्यांच्या निषेधार्थ येथील हॅरीस पार्कमध्ये काल रात्री मोर्चा नेला होता.

या मोर्चात दोनशे भारतीय विद्यार्थी सामील झाले होते. त्यांच्याकडे बेसबॉल बॅट्स आणि हॉकी स्टिक्सही होत्या. आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याने चिडलेल्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन पोलिसांनी हे हल्ले संधी साधून केलेले आहेत, असे सांगून ते वर्णद्वेषातून होत नसल्याचे म्हटले आहे. हॅरीस पार्क नावाच्या भागात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तिथेच हे घडत असल्याने ते त्यांच्याबाबतीतच घडते आहे, असे चित्र निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.