1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: लाहोर , सोमवार, 31 डिसेंबर 2007 (19:44 IST)

शरीफ यांची मुशर्रफच्या राजीनाम्यामी मागणी

राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या राजीनाम्याची मागणी करताना माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आठ जानेवारीस देशातील सार्वत्रिक निवडणूका मुक्त व निष्पक्षा वातावरणात पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सर्वसंमतीच्या सरकार स्थापण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या सर्व समस्यांचे मूळ मुशर्रफ असून ते पायउतार न झाल्यास देशाचे अस्तित्व धोक्यात येईल, असे म्हटले आहे.

शरीफ यांनी निवडणूकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाबाबत सांगताना भविष्यात मुशर्रफ यांच्याबरोबर कोणत्याही सरकारमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. मुशर्रफ यांच्या राजवटीत मुक्त व निष्पक्ष निवडण़का शक्य नाही. तरीही आम्ही निवडणूक लढवणार आहोत. पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाझ सत्तेत आल्यास मुशर्रफ यांच्यासोबत काम करणार काय? या प्रश्नावर ते अक्षरश: भडकले.

देशातील घटना व सवौच्च कायद्याची पायमल्ली करणारे मुशर्रफ, सवौच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची घटनाबाह्य पद्धतीने हटवणारेही मुशर्रफ, अशी संभावना करून त्यांच्यावर तोफ डागली. अशा व्यक्तीसोबत आपण काम करण्याची तुमची इच्छा आहे काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. अशा व्यक्तीपासून देशास सुटका आवश्यक आहे. अशा व्यक्तीसोबत काम करणे म्हणजे नागरिकांशी प्रतारणा करणे असल्याचे त्यांनी म्हटले. मुशर्रफ यांच्यावर निवडणूका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा आरोप करताना त्यांनी नियोजित आठ जानेवारीस निवडणूका घेण्याची मागणी केली.