मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. इंटरव्ह्यू टिप्स
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (19:33 IST)

इंटरव्यू देण्यापूर्वी या गोष्टीं लक्षात ठेवा

एखाद्या खाजगी क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी जात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या. 
 
1 सोशल मीडियाचे ज्ञान ठेवा- आपण कोणता क्षेत्रात काम करत आहात हे महत्त्वाचे नाही तर सोशल मीडियावर काय चालले आहे हे आपल्याला माहिती असणे महत्त्वाचे आहे. या मुळे आपले ज्ञान देखील वाढेल आणि व्यक्तिमत्त्व देखील सुधारेल. 
 
2 संभाषण कौशल्य - आपली वेगळी छवी बनविण्यासाठी संभाषण कौशल्य असणे महत्वाचे आहे.या साठी आपले इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व देखील असावे. आपली इंग्रजी चांगली असण्यासह आपली संभाषण शैली  देखील चांगली आणि प्रभावी असावी. या मुळे आपली निवड नक्की होईल. 
 
3 नोकरीसाठीची जिद्द -मुलाखत किंवा इंटरव्यू देताना आपली मोकरीसाठीची जिद्द दाखवावी लागते. आपण हे दर्शवावे की आपण आपल्या कामासाठी प्रामाणिक आहात आणि त्यासाठी शक्य ते सर्व करू शकता. असं केल्याने आपल्याला सकारात्मक उत्तर मिळू शकेल. 
 
4 वेळेचे व्यवस्थापन- कार्यालयात मिळणाऱ्या कामाला सर्वच करतात परंतु जे लोक काम वेळेवर करतात त्यांची प्रशंसा होते. यालाच वेळेचे व्यवस्थापन म्हणतात. जर आपण इंटरव्यू देताना हे सांगण्यात यशस्वी होता तर आपल्यामध्ये वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आहे आणि आपण ही नोकरी मिळविण्यात यशस्वी व्हाल.  
 
5 सर्जनशील स्वभाव- कोणत्याही व्यक्तीमध्ये सर्जनशील स्वभाव असणे हे त्याच्या साठी फायदेशीर आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात या स्वभावामुळे आपल्याकडे लोकांचे लक्ष केंद्रित करू शकता. या मुळे आपल्याला ही नोकरी सहज मिळू शकते.