सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2017 (21:12 IST)

गेलचा महारिकॉर्ड: टी-20मध्ये 10 हजार धावा करणारा पहिला फलंदाज

कैरेबियाई धुरंधर क्रिस गेलने शेवटी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर   इतिहास घडवला. टी-20मध्ये 10000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे.  मंगळवारी आयपीएल-10 च्या 20व्या सामन्यात त्याने ही उपलब्धी मिळवली. रॉयल चैलेंजर्स बेंगलुरुचा 37 वर्षीय या सलामी फलंदाजाने गुजरात लॉयंसच्या विरुद्ध तिसरा रन काढताच ह्या जादुई आकड्याला हसील केले.  
 
ख्रिस गेल आपल्या टी-20 क्रिकेट करियरमध्ये ऐकून 20 संघाकडून खेळला आहे. जाणून घ्या त्या संघांचे नाव -
 
(1.बारिसाल बुल्स, 2. बारिसाल बर्नर्स, 3.चटगांव विकिंग्स, 4. ढाका ग्लैडिएटर्स, 5. जमैका, 6.जमैका टलवाह, 7.कराची किंग्स, 8.कोलकाता नाइट राइडर्स, 9.लाहोर कलंदर्स, 10. लॉयंस, 11.मैटाबेलेलैंड टस्कर्स, 12. मेलबर्न रेनगेड्स, 13.पीसीए मास्टर्स XI, 14. रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु, 15.समरसेट, 16.स्टैनफोर्ड सुपरस्टार्स, 17. सिडनी थंडर 18. वेस्ट इंडियंस, 19. वेस्टइंडीज, 20. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) 
 
टी-20 करियरमध्ये सर्वाधिक धावा काढणारे टॉप-5 बैट्समैन
1. ख्रिस गेल (2005-17): 290 मैच, 285 पारी, 10000* धावा, 18 शतक
2. ब्रेंडन मॅक्कुलम (2005-17): 271 मैच, 266 पारी, 7524 धावा, 7 शतक 
3. ब्रैड हॉग (2003-17): 270 मैच, 256 पारी, 7338 धावा, 2 शतक 
4. डेविड वॉर्नर (2007-17): 227 मैच, 226 पारी, 7156 धावा, 5 शतक 
5. कीरोन पोलार्ड (2006-17): 363 मैच, 326 पारी, 7087 धावा, 0 शतक