गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (16:48 IST)

आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी अर्पण

तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचे फ्रॅन्चायझी अनंत अंबानी यांनी आयपीएलच्या ट्रॉफीसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी अर्पण केली. आयपीएलच्या अंतिम लढतीत अखेर मुंबईकर पुण्याला भारी पडले होते. माफक धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत करत आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा केला होता.  मुंबईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद ठरले. त्याबरोबरच आयपीएलमध्ये तीन विजेतेपदे पटकावणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला.