शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Updated : बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:11 IST)

आयपीएल 2020ची टायटल स्पॉन्सरशीप Dream 11कडे

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. यामध्ये टाटा सन्स व्यतिरिक्त बायजू. रिलायन्स जिओ, पतांजली, Dream 11 आणि अनअकॅडमी यांनी टायटल स्पॉन्सरशीपसाठी रस दाखवला. पण आयपीएल 2020च्या मोसमाच्या टायटल स्पॉन्सरशीच्या शर्यतीत Dream 11ने बाजी मारली.
 
भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं यंदा संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपवरून माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.
 
ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशीप नावावर केली असून अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती.