गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: शारजा , बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:58 IST)

गेल मैदानावर परतला; आरसीबीविरुध्द खेळणार?

किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अन्नातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला होता. तेथे तो उपचार घेताल्यानंतर सरावासाठी मैदानावर परतला आहे. त्यामुळे त्याला आता गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्दच्या साममन्यासाठी अंतिम अकरामध्ये संधी दिली जाऊ शकते. पंजाबने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवर टि्वट करत गेल सरावासाठी मैदानावर परतल्याचे सांगितले आहे. गेलने आतापर्यंत हंगामातील एकही सामना खेळलेला नाही.
 
त्याचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी आहे. पंजाबचे स्वीय सहायक वसी जाफर यांनी सांगितले की, गेल तयार दिसत आहे व तो मैदानावर जाण्यासाठी इच्छुक आहे. तो वास्तविकपणे खूप चांगल पध्दतीने प्रशिक्षण घेत आहे. नेट्‌समध्ये सराव करताना तो चांगला दिसत आहे.