चेन्नईच्या टीमसाठी एक चांगली बातमी, रुतुराज गायकवाड संघात दाखल
चेन्नईचा फलंदाज रुतुराज गायकवाड आता संघात दाखल झाला असून त्याने सराव सुरू केला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे हा 23 वर्षीय महाराष्ट्राचा खेळाडू दोन आठवड्यांपासून क्वारंटाईन होता. त्यामुळे मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो खेळला नव्हता. सीएसकेने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर केला आहे.
सीएसके टीमचे 13 सदस्य मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यात ऋतुराज आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचा समावेश होता. चहर व इतर 11 जण बरे झाले होते. रुतुराजला सीएसकेमध्ये सुरेश रैनाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.