मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: अबुधाबी , बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (15:10 IST)

कोणाला मिळेल प्ले ऑफचे तिकीट?

आयपीएलमध्ये आज (बुधवारी) होणार्या मुंबई व बंगळुरू यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांची नजर प्ले ऑफमध्ये आपली जागा निश्चित करण्यावर असेल.
 
मुंबईला मागील सामन्यात राजस्थानने 8 गडी राखून पराभूत केले होते. त्यांचे 14 गुण आहेत तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचेही 14 गुण झाले आहेत. त्यांनाही  रविवारी चेन्नईकडून पराभूत व्हावे लागले होते. बुधवारच्या सामन्यात जो संघ बाजी मारेल त्याचे प्ले ऑफमधील स्थान पक्के होणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने सलग तिसर्या सामन्यातूनही तो बाहेर राहण्याची शक्यता आहे.
 
रोहितची तंदुरूस्ती या सामन्यापूर्वी चर्चेचा विषय आहे. तो मागील सामन्यात खेळू शकला नव्हता. रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईला सौरभ तिवारी व इशान किशन यांच्यावर विश्वास दाखवावा लागेल. क्विंटन डी कॉक राजस्थानविरुध्द अपयशी ठरला होता. त्यामुळे तो प्रभाव पाडणसाठी उत्सुक असेल. किशन व सूर्यकुमार यादव यांनीही आतापर्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने राजस्थानविरुध्द सात षटकार मारून आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. हार्दिकशिवाय कर्णधार कायरन पोलार्ड व कृणाल पांड्या संघात असे खेळाडू आहेत जे मोठे फटके मारून सामन्यात अंतर निर्माण करू शकतात. मुंबईचे गोलंदाज मागील सामन्यातील पराभव विसरून नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. मागील सामन्यात बेन स्टोक्स व संजू सॅमसनविरुध्द त्यांचे काही चालू शकले नव्हते. ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांनी आतापर्यंत गोलंदाजीचे नेतृत्व सांभाळले आहे. तिसरा गोलंदाज म्हणून जेम्स पॅटिन्सन व नाथन कुल्टर नाइल यांच्यापैकी कोणा एकाला निवडावे लागेल. बंगळुरूकडून कर्णधार कोहली शानदार लयीत आहे. ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच, देवदत्त पड्रिकल व ए.बी. डी'व्हिलिर्स यांना कामगिरीत अजून सातत्य दाखवावे लागेल. जर बंगळुरूचे आघाडीचे फलंदाज योगदान देऊ शकले तर विरोधी संघाच्या अडचणी वाढू शकतात. ख्रिस मॉरीस, मोईन अली व गुरकिरत मानही तळातील मध्यक्रमात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. मात्र, आरसीबीचा मुंबई-बंगळुरूमध्ये आज चुरशीची लढत संघ नवदीप सैनीच्या दुखापतग्रस्त होण्यामुळे गोलंदाजी विभागात चिंतीत आहे. सैनीला मुंबईविरुध्दच्या सामन्यात खेळण्याबाबत अद्याप स्पष्ट सांगणत आलेले नाही. जर तो नाही खेळला तर मॉरीस व मोहम्मद सिराज यांच्याशिवाय इसुरू उडानाची जबाबदारी वाढणार आहे.
सामन्याची वेळ
संध्याकाळी 7.30 वाजता.