विराट-रोहित आज आमने-सामने!

rohit virat
चेन्नई| Last Modified शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (14:23 IST)

आयपीएलमध्ये मबई विरुद्ध आरसीबी सलामीची लढत
, दि. 8- इंडियन प्रीअिमर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला
शुक्रवारपासून सुरुवात होणार असून सलामीच्या लढतीत रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नईच्या एम. ए. चिदंबर स्टेडियमध्ये होणार्या
या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आणि
उपकर्णधार अशी लढत पाहायला मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांना स्टेडियमध्ये प्रवेशास मनाई आहे. मात्र, असे असले तरी या दोन संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये झाली. मात्र, याचा रोहितच्या मुंबई इंडियन्स संघावर परिणाम झाला नाही. मुंबईने सलग दुसर्यांमदा आणि एकूण पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकाविले आहे. त्यामुळे यंदाही मुंबईलाच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.
जेतेपदाची हॅट्‌ट्रिक करण्यासाठी उत्सुक
मुंबईच्या संघात रोहितसह सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या,कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यासारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात क्विंटन डी कॉक (पहिल सामन्याला मुकणार), केरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या स्टार परदेशी खेळाडू असल्याने मुंबईचा संघ यंदा जेतेपदाची हॅट्‌ट्रिक करण्यासाठी उत्सुक आहे.

मुंबई आणि आरसीबी हे आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघ मानले जातात. त्यातच मुंबई आणि आरसीबी या संघांचे नेतृत्व अनुक्रमे रोहित शर्मा
आणि विराट कोहली करतात. त्यामुमळे या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तसेच या दोन्ही संघांमध्ये बरेच स्टार खेळाडू असल्याने या
सामन्यावर आणि काही खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची विशेष नजर असेल.
जेतेपदाचा दुष्काळ संपवणार
दुसरीकडे यंदाही कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून जेतेपदाची चाहत्यांना अपेक्षा आहे. बंगळुरूला अजून आयपीएल स्पर्धा जिंकता आली नसून यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बंगळुरूचा संघ नेहमीच कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर अवलंबून असतो. मात्र, या दोघांवरील ताण कमी करण्यासाठी यंदा बंगळुरूने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसनला मोठ्या किंमतीत खरेदी केले. त्यामुळे हे दोघे कशी कामगिरी करतात याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.
मुंबई विरुद्ध होणार्या. पहिल्या लढतीआधी आरसीबीचा कर्णधार विराटने संघातील खेळाडूंना कानमंत्र दिला आहे.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

अभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे ...

अभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे नाव, अशी प्रतिक्रिया दिली  CSKच्या फलंदाजाने
गेल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणार्या चेन्नई सुपर किंग्जचा ...

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित नाही! मोठे कारण समोर येत आहे
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...

सुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...

सुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार
आयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स यांना पूर्ण वेतन मिळेल, का ते जाणून घ्या
डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...