मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : रविवार, 17 एप्रिल 2022 (16:10 IST)

CSK vs GT IPL 2022 : चेन्नई विरुद्ध गुजरात सामना कधी, कुठे आणि कसा पहायचा जाणून घ्या

IPL 2022 च्या 29 व्या सामन्यात, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा संघ आणि गुजरात टायटन्स  आज संध्याकाळी आमनेसामने येणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा दोन नवीन कर्णधारांवर असतील. हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवींद्र जडेजा कडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेला पहिल्या चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, संघाने आपला शेवटचा सामना जिंकला असून सध्या ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.गुजरात टायटन्स या लीगच्या नव्या संघाने हंगामाची धमाकेदार सुरुवात केली आहे. पाच सामन्यांपैकी चार विजयांसह संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.
 
IPL 2022 चा 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रविवार, 17 एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. 
 
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स IPL 2022 च्या सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहू शकाल, जिथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकायला मिळेल. हिंदी आणि इंग्रजीशिवाय तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि गुजराती या भाषांचाही यावेळी समावेश करण्यात आला आहे. स्टार गोल्ड चॅनलवर आयपीएलचे सामने थेट पाहू शकता.