मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (23:00 IST)

DC vs RCB IPL 2022 :डेव्हिड वॉर्नरची तुफान खेळी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2022 च्या 27 व्या सामन्यात आमनेसामने आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बेंगळुरू संघाने शेवटच्या चार षटकात 69 धावा केल्या. आरसीबीसाठी, दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी 97 धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 189 धावांपर्यंत नेली. 
 
डेव्हिड वॉर्नरने आणखी एक शानदार खेळी खेळताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 29 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील 52 वे अर्धशतक केले. या खेळीत त्याने तीन चौकार आणि चार षटकार मारले. डेव्हिड वॉर्नरने पहिल्याच षटकात शाहबाज अहमदचा त्रिफळा उडवला. या षटकात वॉर्नरने एक चौकार आणि एक षटकार ठोकत 15 धावा केल्या.