शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (21:21 IST)

RCB vs CSK, IPL 2022:बेंगळुरूने चेन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले, महिपाल लोमररने 42 धावा केल्या

RCB vs CSK
आयपीएल 2022 चा 49 वा सामना फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने सीएसके समोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. फाफ डू प्लेसिस (38) आणि विराट कोहली (30) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या, पण त्यानंतर चेन्नईकडून फिरकीपटूंनी जोरदार पुनरागमन केले. महिपाल लोमरोरने 42, रजत पाटीदारने 21 आणि दिनेश कार्तिकने 26* धावा करत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. मोईन अलीने दोन आणि महेश तीक्षानाने तीन गडी बाद केले.