शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (23:18 IST)

RCB vs GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुजरात टायटन्सचा पराभव करून टॉप-4 मध्ये पोहोचले

gujarath - bangalore
rcb vs gt  2022: IPL 2022 चा 67वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18.4 षटकांत 2 बाद 170 धावा केल्या आणि सामना 8 गडी राखून जिंकला.  
 
गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. पांड्याने 47 चेंडूत 62 धावा केल्या. शुभमन गिल 1, साहा 22 धावा, वेड 16 धावा आणि मिलर 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.