आयपीएल सामने भारताच हवे होते- दुर्राणी
आयपीएल सामन्यांना आफ्रिकेत दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली असली तरी हे सामने भारताच व्हायला हवे होते असे मत माजी फलंदाज सलीम दुर्राणी यांनी व्यक्त केले आहे. भारतात आयपीएलचे मोठे क्रेझ असून, आयपीएल सामन्यांची प्रसिद्धी वाढत असल्याचे ते म्हणाले. देशात निवडणुका होत असल्याने या सामन्यांना रद्द करणे गरजेचे होते. कालांतराने हे सामने घेता येणे शक्य असल्याने अफ्रिके ऐवजी हे सामने भारतातच घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.