शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वार्ता|

इंग्लंडचे खेळाडूही आयपीएलच्या प्रेमात

अमाप पैस आणि प्रसिद्धी मिळत असल्याने इंडियन प्रीमीअर लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील खेळाडू किती आतूर झाले आहेत याचाच प्रत्यय इंग्लंडमध्ये येत आहे.

इंग्लंड क्रिकेट असोसिएशनने इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएल सामने खेळण्यास परवानगी नाकारल्यानंतरही या खेळाडूंनी पुढल्यावर्षीच्या सामन्यात खेळण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

पुढच्यावर्षी हे समाने 10 एप्रिल ते 29 मे दरम्यान खेळले जाणार आहेत. यानंतर या खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. या दरम्यान आपण आयपीएलमध्ये खेळू असे खेळाडूंचे म्हणणे आहे, तर इंग्लंड अ‍ॅड वेल्स क्रिकेट मंडळा(ईसीबी) चे अध्यक्ष जॉईल्स क्लार्क यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंवर आयपीएल विषयी कोणतेही अप्रूप नसल्याचे ते म्हणाले.