शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|

उपांत्य सामन्यासाठी डावपेच तयार: सेहवाग

राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात खेळाडूंकडून फक्त आखण्यात आलेल्या योजनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे दिल्ली डेअरडेव्हील्सचा कर्णधार विरेंद्र सेहवागने स्पष्ट केले आहे.

दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे सांगून मैदानावरील कामगिरीवर निकाल निश्चित होईल. येथील खेळपट्टीवर पहिल्या सत्रात गोलंदाजांना मदत मिळत असल्याने दिसून आल्याने नाणेफेक महत्त्वपूर्ण ठरेल. दोन्ही संघात उत्तम गोलंदाज असल्याचे फटक्यांच्या निवडीवर लक्ष देणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील सवौत्तम गोलंदाज ठरलेल्या सोहेल तन्वीरचा सामना करण्याबाबत, चेंडूच्या गुणवत्तेनुसार फटका निवड हे तंत्र असल्याचे त्याने स्पष्ट केले. संघाची मधली फळी कमकुवत असल्याचे फेटाळून लावताना मुंबईविरूद्धच्या जिंकणे आवश्यक असलेल्या सामन्यात दिनेश कार्तिक व मनोज तिवारी यांनी काढलेल्या 90 धावांकडे लक्ष वेधले.