शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|

केवळ दडपण आल्याने हरलो- युवराज

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे, आम्ही त्यावर चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न केला, परंतु खेळाडूंवर आलेल्या दडपणामुळेच संघाचा पराभव झाल्याची कबुली किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार युवराज सिंह याने दिली आहे.

शनिवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या उपान्त्य सामन्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता. या सामन्यत चेन्नईने पंजाबचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या सामन्याचे फलंदाजांवर बरेच दडपण होते. मोठी धावसंख्या उभारण्याच्या नादात विकेट गमावल्याचे युवराज म्हणाला. सुरुवातीच्या दहा षटकांमध्ये फलंदाज टिकले असते तर मोठी धावसंख्या उभारण्यात आम्हाला यश मिळाले असते, परंतु संघ अंदाज घेण्यास चुकल्याचे त्याने कबूल केले.