शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By एएनआय|
Last Modified: कराची , शुक्रवार, 30 मे 2008 (15:55 IST)

ढिसाळ कामगिरीचे आफ्रिदीला शल्य

पाकिस्तानचा अष्टपैलू किक्रेटपटू शाहीद आफ्रिदीची फलंदाजी शैली ट्वेंटी क्रिकेटशी सुसंगत असूनही आयपीएलमध्ये तो प्रभावी कामगिरी करू शकला नाही. याबाबत तो असमाधानी आहे. ट्वेंटी क्रिकेटमध्ये या स्पर्धेत आपणास शंभर टक्के योगदान द्यायचे होते.

मात्र दबावात खेळल्याने आक्रमक फलंदाजी शैली असूनही अयशस्वी ठरल्याने त्याने स्पष्ट केले. तो खेळत असलेला डेक्कन चाजर्स संघ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकला नाही. यामुळेच डेक्कन संघ गुणतक्त्यात सर्वात खाली गेल्याचेही त्याने मान्य केले. दहा सामन्यातून तो फक्त 81 धावा जमवू शकला आहे.