रविवार, 12 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|
Last Modified: हैद्राबाद , सोमवार, 26 मे 2008 (22:00 IST)

रणनिती तयार करावी लागेल- द्रविड

आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात बंगळूर रॉयल चॅलेंजर्सने डेक्कन चार्जर्सविरूद्ध पाच गडी राखून मिळविला. पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी संघ व्यवस्थापकाला आत्तापासूनच रणनिती आखवी लागणार असल्याचे कर्णधार राहूल द्रविडने सांगितले आहे.

सुरवातीला सलग झालेल्या पराभवांमुळे आमच्या अपेक्षांवर पाणी फेरले. परंतु, हा खेळाचा एक भाग असून उपांत्य फेरीत पोहचत नसल्यावर खेळात सुधारणा करावी लागणार असल्याचे द्रविडने सांगितले.

प्रत्येक सहभागी संघाला यावर विचार करावा लागणार असल्याचे त्याने सांगितले. स्पर्धा संपल्यावर आम्ही सर्व अडचणींवर विचार करणार असल्याचेही त्याने म्हटले.