शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|

वेंगसरकरही आयपीएलमध्ये?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकरही आता पुढील वर्षी आयपीएल समितीत दिसणार आहेत.

वेगसरकर यांचा बीसीसीआयचा कार्यकाल सप्टेंबर पर्यंत संपत असून, यानंतर त्यांना आयपीएलची मोठी जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

वेंगसरकर यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला आहे.आयपीएलने तशी अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांना या संदर्भात ऑफर देण्यात आल्याचे आयपीएल अधिकार्‍यांनी कबूल केले आहे.

या करारात त्यांना आयसीएलशी कोणताही करार करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.