Last Modified: मुंबई , मंगळवार, 3 जून 2008 (16:52 IST)
वॉर्नला ऑफरची घाई नको- बीसीसीआय
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) चा बादशहा ठरलेला राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉर्नला देशातील युवा फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षित करण्यासाठी आत्ताच ऑफर देण्याची घाई करू नये, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मांडले आहे.
भारतातील युवा फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा भारतात येण्यास इच्छूक असल्याचे वॉर्नने शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या जागतिक प्रसिद्धीच्या फिरकी गोलंदाजाने कसोटीत 708 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 293 बळी मिळविले आहेत. पंजाब किंग्ज इलेव्हन संघातील पियुष चावला, दिल्ली डेयर डेविल्सचा अमित मिश्रा आणि संघ सहकारी युसूफ पठाण आणि रविंद्र जडेजा यांच्यात प्रतिभा असल्याचे वॉर्नने म्हटले आहे.