रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (08:36 IST)

IPL Playoffs Schedule:IPL प्लेऑफ सामने कधी खेळले जातील हे जाणून घ्या

आयपीएल 2024 प्लेऑफच्या टप्प्यात पोहोचली आहे. रविवारी 19 मे रोजी KKR आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लीगचा शेवटचा सामना बारसापारा स्टेडियमवर पावसामुळे वाहून गेला. आता मंगळवार, 21 मे पासून प्लेऑफ सामने खेळवले जाणार असून, यामध्ये 4 संघ निश्चित करण्यात आले आहेत. 
 
IPL 2024 मध्ये शीर्षस्थानी चार संघ आहेत, ज्यात KKR, SRH, RR आणि RCB यांचा समावेश आहे. कोलकाता नाईट रायडर्स 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या स्थानावर, रॉयल्स संघ तिसऱ्या आणि आरसीबी चौथ्या स्थानावर आहे. 

IPL 2024 चे सामने कधी होणार?
21 मे ते 26 मे दरम्यान आयपीएलचे प्लेऑफ सामने होणार आहेत. 

आयपीएल प्लेऑफ 2024 कुठे होणार आहे?
आयपीएलचे प्लेऑफ सामने दोन ठिकाणी आयोजित केले जातील, पहिला क्वालिफायर नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाईल. तर दुसरा क्वालिफायर एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल. एमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. 
 
क्वालिफायर-1 एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास, पंचांकडे प्रत्येकी किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटे असतील. पावसामुळे 5 षटकेही खेळता आली नाहीत तर पंच सुपर ओव्हरद्वारे निकाल देण्याचा प्रयत्न करतील. सुपर ओव्हरही शक्य नसेल तर सामना दुसऱ्या दिवशी हलवला जाऊ शकतो. आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे. 
 
21 मे 2024 रोजी  केकेआर वि एसआरएच  क्वालिफायर-1 सामना नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवला जाणार .
22 मे 2024 रोजी आरसीबी विरुद्ध आरआर एलिमिनेटर सामना नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवला जाणार .
24 मे 2024 रोजी  पहिला पात्रता हरणारा संघ वि एलिमिनेटर विजेता क्वालिफायर-2 सामना एमए चिदंबरम, चेन्नई येथे खेळवला जाणार. 
 
26 मे 2024 रोजी  क्वालिफायर 1 विजेता वि क्वालिफायर 2 विजेताअंतिम सामना एमए चिदंबरम चेन्नई येथे खेळवला जाणार. 
 
Edited by - Priya Dixit