सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2024 (00:15 IST)

PBKS vs CSK : चेन्नईने पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला

IPL 2024 च्या 53 व्या सामन्यात, पंजाब किंग्जचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. पंजाबचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाने  20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 139 धावा केल्या.

आयपीएलच्या 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानन्तर प्रथम फलंदाजी करताना चैन्नई ने 20 षटकात 9 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 139 धावा करू शकला. रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी करत  43 धावा करण्यासोबतच तीन विकेट्सही घेतल्या. 
 
धरमशाला येथील या विजयासह चेन्नईने मागील सामन्यात पंजाबकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. पंजाबने चेन्नईला त्याच्या होम ग्राउंड चेपॉकवर पराभूत केले होते. यासह पंजाबची चेन्नईविरुद्धची विजयी मालिकाही संपुष्टात आली. उभय संघांमधील मागील सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पंजाब संघाने विजय मिळवला होता. सहाव्या सामन्यात सीएसकेने बाजी मारली. 
 
या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 11 सामन्यांत सहा विजय आणि पाच पराभवांसह 12 गुण आहेत. या विजयामुळे सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. त्याचबरोबर पंजाब संघाचा हा सातवा पराभव ठरला. हा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. चेन्नईचा पुढील सामना गुजरात टायटन्सशी अहमदाबादमध्ये 10 मे रोजी होणार असून पंजाबचा सामना 9 मे रोजी धर्मशाळा येथे आरसीबी शी होणार आहे. 
 
Edited By- Priya Dixit