सावध व्हा, अन्यथा युट्यूब चॅनल डिलीट केलं जाईल
गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यामध्ये जर कुठल्या चॅनलमुळे युट्यूबची कमाई होत नसेल, तर ते चॅनल डिलीट केलं जाईल किंवा त्यावर निर्बंध लावले जातील. युट्यूबच्या नव्या नियमांनुसार, युट्यूबकडे आता तुमचं चॅनल डिलीट करण्याचा अधिकार आहे.
युट्यूबने “Account Suspension & Termination” नावाने एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. या अंतर्गत जर तुमच्या युट्यूब चॅनलने कंपनीची कमाई होत नाही, तर युट्यूब तुमचं अकाऊंट किंवा चॅनल डिलीट करेल. युट्यूबचे नवे नियम 10 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
यासंबंधी युट्यूबने गेल्या आठवड्यात युट्यूबर्सला ई-मेल पाठवला आहे. तसेच, युट्यूबच्या नव्या नियमांनुसार जर कुणाला त्यांचं चॅनल डिलीटच होण्याची भीती असेल तर तुम्ही तुमचा कंटेट डाऊनलोड करु शकता, असंही युट्यूबने सांगितलं आहे.