शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (09:50 IST)

खास SBI च्या ग्राहकांसाठी अलर्ट, असे राहा सावध

देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क केलंय. SBI नं ट्वीट करून ऑनलाइन फ्राॅडपासून वाचण्यासाठी ग्राहकांना अलर्ट केलंय. बँकेनं सांगितलंय की ग्राहकांनी फेक सोशल मीडिया अकाउंटपासून सावध राहावं.
 
SBI नं ग्राहकांना फेक सोशल अकाउंटपासून सावध राहायला सांगितलंय. बँकेनं सांगितलं की ग्राहकांनी फक्त सोशल मीडिया अकाउंटच फाॅलो करावं. बँकेच्या नावाचं अनऑथोराइज्ड सोशल मीडिया अकाउंट फाॅलो करणं नुकसानीचं होऊ शकतं. बँकेनं आपल्या ट्वीटमध्ये सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मसाठी SBIच्या व्हेरिफाइड आणि ऑफिशियल हँडलबद्दल सांगितल आहे.
 
SBI नं ट्वीटमध्ये सांगितलंय की, सोशल मीडियावरच्या फेक अकाउंटवर पैसे आणि वेळ खर्च करू नका. बँकेनं आपल्या ट्वीटमध्ये सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मसाठी SBI च्या व्हेरिफाइड अकाउंटबद्दल सांगितलंय.
 
फेसबुक: @StateBankOfIndia
 
इंस्टाग्राम: @theofficialsbi
 
ट्विटर: @TheOfficialSBi
 
लिंक्डइन: State Bank of India (SBI)
 
गुगल: State Bank of India
 
यूट्यूब: State Bank of India
 
क्वोरा: State Bank of India (SBI)
 
पिनट्रेस्ट: State Bank Of India