शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (14:42 IST)

Hyundai ने सादर केले Elantraचा पहिला लुक, 3 ऑक्टोबर रोजी होईल लाँच

Hyundai मोटर इंडिया एका नंतर ऐक नवीन नवीन मोटार कारी भारतात लाँच करत आहे. ग्रँड आय 10 NIOS नंतर आता कंपनी आणत आहे त्याची नवीन Elantra, ज्याला दिवाळी अगोदर अर्थात 3 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात येईल. पण लाँच करण्याअगोदर कंपनीने या कारचा फर्स्ट लुक दाखवला आहे. कंपनीकडून दोन फोटो शेअर करण्यात आले आहे, तर जाणून घेऊ नवीन अवतारात कशी दिसते Elantra...     
 
पहिल्या दृष्टीत नवीन Elantra तुम्हाला नक्कीच इम्प्रेस करू शकते. याचे डिझाइन जास्त स्पोर्टी आणि स्टायलिश दिसत आहे. कारमध्ये हेक्सागोनल ग्रिल देण्यात आले आहे ज्यामुळे ही फ्यूचरिस्टिक लुक देखील देते. त्याशिवाय यात शार्प आणि और स्लीक हेडलाईट्स आणि फोग लॅम्प्स बघायला मिळेल. तसेच यंदा नवीन Elantra मध्ये 6 इंचीचे नवीन डिझाइन असणारे एलाय व्हील्स बघायला मिळतील.  
 
मागून बघितले तर नजर याच्या नवीन स्लीक LED टेललाइट्सवर जाते जी तुम्हाला BMW ची आठवण करून देईल. त्याशिवाय याचा बंपर स्पोर्टी असून ही ड्यूल कलरमध्ये आहे. ही कार मिड-साइज सेगमेंटमध्ये येते. अशात कंपनीने यात बरेच काम केले आहे. इंजिनाबद्दल अद्याप कंपनीकडून कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे. याची किंमत 13.81 लाख रुपये एवढी आहे. असे मानले जात आहे की नवीन मॉडेल सद्याच्या मॉडेलपेक्षा थोडे महाग असू शकते.