मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (14:20 IST)

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर भेट दिली आहे. सरकारकडून नुकतेच कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने कंपनीने आपल्या काही मॉडलस्च्या किमतीत 5,000 रुपये (एक्स-शोरूम किंमतींवर) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या लोकप्रिय मॉडल्सच्या किंमती कमी झाल्या 
मारुती सुजुकीने ऑल्टो 800, ऑल्टो K10, स्विफ्ट डिझेल, सेलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, विटारा ब्रेज़ा आणि   एस-क्रॉसच्या किंमतींत फ्लॅट 5000 हजार रुपये कमी केले आहे. नवीन किंमत 25 सप्टेंबर 2019 पासून संपूर्ण देशात लागू होतील. 

विक्रीत होईल वाढ 
सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्स कमी झाल्यानंतर मारुती सुजुकी ही पहिली अशी कार निर्मता कंपनी आहे ज्याने सर्वात आधी मोटार कार्सच्या किंमतींत घट केली आहे. कंपनीने ऑटोमोबाइल उद्योगात मागणीला पुनर्जीवित करण्यासाठी सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि याचा सरळ फायदा ग्राहकांना होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे त्यांच्या गाड्यांची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. 

दुसर्‍या कार कंपन्या किंमत कमी करतील का ?  
एका रिपोर्टप्रमाणे टोयोटा आणि होंडाचे मानणे आहे की ते आधीपासूनच चांगले ऑफर्स ग्राहकांना देत आहे अशात किंमत कमी करण्याची कुठलीही  गुंजाइश नाही आहे. जेव्हा Hyundai शी चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की कंपनी आधीपासूनच चांगले ऑफर्स आणि डिस्काउंट ग्राहकांना देत आहे. अशात किंमती कमी करण्याचा सध्या आमचा कोणताही हेतू नाही आहे.