सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (17:32 IST)

Aadhaar Card मध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी लागेल या कागदपत्रांची आवश्यकता

जर आपल्या Aadhaar Card मध्ये जन्म तारीख बरोबर नसेल तर आपण ते आधार केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन बदलू शकता. आधारच्या अधिकृत संस्था UIDAI नुसार प्रामाणिक कागदपत्रांची आवश्यकता असेल. UIDAI नुसार जन्माच्या तारखेसाठी 9 प्रकारचे कागदपत्र वैध असतील आणि या कागदपत्रांमध्ये तीच जन्मतारीख असावी, जी आपण आधार कार्डमध्ये नोंद करवू इच्छित आहात.
 
Aadhaar च्या जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र ऑनलाईन स्कॅन करावे लागतील. या व्यतिरिक्त आपण बँक, पोस्ट ऑफिस आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये देखील जन्मतारीख सुधारू शकता. यूआयडीएआयवर दिलेल्या माहितीनुसार आपण खालील कागदपत्रांसह आधार सुधारू शकता:
 
1. बर्थ सर्टिफिकेट
2. एसएसएलसी बुक/सर्टिफिकेट
3. पासपोर्ट
4. ग्रुप 'ए' गॅझेटेड ऑफिसराने लेटरहेड वर दिलेला बर्थ सर्टिफिकेट
5. पेन कार्ड
6. कोणत्याही सरकारी बोर्ड आणि विद्यापीठाची मार्कशीट
7. सरकारी फोटो ओळखपत्र ज्यामध्ये जन्मतारीख मुद्रित असावी. पीएसयूने जारी केलेला फोटो आयडी
8. केंद्र / राज्य सरकारचे पेन्शन पेमेंट ऑर्डर
9. केंद्र सरकारच्या आरोग्य केंद्राचे आरोग्य कार्ड किंवा एक्ससर्विस व्यक्तीचे आरोग्य योजना फोटो कार्ड