गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (10:25 IST)

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील फेक अकाऊंटचा शोध लावणाऱया यंत्रणेचा शोध (अल्गोरिदम) संशोधकांनी लावला आहे. 
 

फेक अकाऊंट्समुळे नेटवर्कमध्ये असलेल्या अन्य युजर्ससाठी खोटय़ा लिंक तयार होतात, यावर आधारित संशोधनातून नवे अल्गोरिदम तयार झाले आहे. या संशोधनाची माहिती सोशल नेटवर्क ऍनालिसीस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या अल्गोरिदमची चाचणी खोटय़ा आणि खऱया युजर्सवर करण्यात आलेली आहे. तब्बल दहा वेगवेगळ्या साईट्सवरील अकाऊंटवर ही चाचणी झाली आणि ती यशस्वी झाली आहे. ही यंत्रणा वापरून ट्विटरच्याही फेक युजर्सला आळा घालता येणार आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे संशोधन समजले जात आहे.