रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

पेटीएम, गुगल पे, भीम अॅप वरून फसवणूक, सावध राहा

क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर आणि कार्ड वेरिफेकेशन वॅल्यू (सीव्हीव्ही) आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारून फसवणूक करणार्‍या चोरट्यांनी आता आपलं लक्ष भीम, गुगल पे आणि पेटीएम अॅपवर केंद्रित केले आहे. नवीन सोयी सुविधा आल्यावर बदमाश त्याचा गैरफायदा घेऊन फसवणूक करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
 
बोगस ग्राहक बनून दुकानदाराकडून गुगल पे नंबर घेऊन सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील वारजे येथील रवींद्र सपकाळ यांनी याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सपकाळ यांचे टायरचे दुकान असून त्यांना टायर विकत घेयचे असून पैसे ऑनलाईन पाठवतो असा फोन आला. त्यांनी गुगल पे नंबर विचारून सांगितले की यावर पे म्हणून मेसेज येईल त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पैसे मिळतील. त्यावर विश्वास ठेवून सपकाळ यांनी पे मेसेजवर क्लिक केले. पैसे येत नसल्याचे म्हणून त्याने चार वेळा पे मेसेज पाठवून क्लिक करायला सांगितले. नंतर हे यशस्वी झाल्यामुळे टायर विक्री झाली नाही. परंतू नंतर खात्यातून सुमारे सत्तर हजार निघाल्याचे त्यांना आढळून आले.
 
या प्रकारे राहा सावध
 
यात बदमाश शिकार व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करायला सांगतात. अकाउंट लिंक करणे ते स्टेप बाय स्टेप पेमेंट प्रोसेस पर्यंत ये आपल्याला निर्देश देतात. नंतर धूर्तपणे आपलं यूपीआय आयडीला पॅकेज कूपन सांगून सेव्ह करवतात. नंतर यातून पैसा ट्रांसफर करायला सांगतात. यातून पैसा सरळ त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रांसफर होतो.
 
अॅपवर रक्कम ट्रांसफरची मर्यादा 20 ते 30 हजार रुपये पर्यंत असते. अशात बदमाश एका वेळी लिमिटपर्यंतची रक्कम ट्रांसफर करवतात. 
 
शहरी तसेच ग्रामीण भागातील स्मार्ट फोन यूजर्स यांचे टार्गेट असतात. अशात अनेकदा ग्राहकांची चूक असल्यामुळे बँक देखील मदतीसाठी नकार देते.
 
तेव्हा कोणत्याही अॅपवरुन पैसे पाठविण्यासाठी सांगण्यात येत असल्यास अगोदर अॅपबद्दल पूर्ण माहिती म्हणजे कसे पैसे पाठवायचे अथवा कसे मिळवायचे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
 
कोणत्याही स्कीमच्या मोहात येऊन व्यवहार करताना शिकार होणार नाही याची काळजी घ्या.