1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

Tez Shots खेळा, कॅशबॅक, डिस्काउंट मिळवा

Tez Shots on Google pay
‘गुगल पे’ या अॅपवर आता एक क्रिकेट गेम आला आहे. Tez Shots नावाचा हा गेम खेळून 2 हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. प्रत्येक बॉलवर फटका मारल्यास धावा मिळतील आणि 100 धावा, 500 धावा किंवा त्याहून अधिक स्कोर केल्यास स्पेशल स्क्रॅच कार्ड मिळेल. विशेष म्हणजे एकाचवेळी  सगळ्या धावा करायच्या नाहीत, जेव्हाही  गेम खेळाल त्यावेळी एकूण धावसंख्या वाढेल.
 
हा गेम खेळताना बिल पेमेंटसाठी स्क्रॅच कार्ड देखील मिळतील. किती रुपयांंचं स्क्रॅच कार्ड आहे हे स्क्रॅच केल्यानंतरच कळेल.  या स्क्रॅच कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यंत जिंकू शकतात. सर्वप्रथम 100 धावा केल्यानंतर 50 रुपयांपर्यंतचं स्क्रॅच कार्ड मिळतं, त्यानंतर 500 धावा झाल्यानंतर दुसरं स्क्रॅच कार्ड मिळेल. यामध्ये 100 रुपयांपर्यंत मिळू शकतात.  अशाचप्रकारे  1000, 2000 आणि 3000 धावांसाठी वेगवेगळे स्क्रॅच कार्ड्स मिळतील आणि यातून  2000 रुपयांपर्यंत कितीही रुपये  जिंकू शकतात. यातील कोणत्या स्क्रॅच कार्डवर किती रुपये मिळतील हे नक्की सांगता येऊ शकत नाही.