मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (14:14 IST)

गुगलने प्ले स्टोअरवरून 136 धोकादायक अॅप्स काढले, संपूर्ण यादी पहा आणि आपल्या फोनवरून त्वरित हटवा

सावधान! आपल्या फोनद्वारे आपले  पैसे चोरले जात आहेत आता, हॅकर्स थांबवणे आपल्यावर अवलंबून आहे. झिम्पीरियममधील सुरक्षा तज्ञांनी आणखी एक मालवेअर बद्दल सांगितले आहेत ज्याने जगभरातील अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून लाखो डॉलर्स चोरले आहेत. धोकादायक गोष्ट अशी आहे की हे अॅप्स कदाचित आपल्या फोनवर असू शकतात आणि आपले पैसे चोरू शकतात. गुगल प्ले स्टोअरने अशा 136 अॅप्स शोधल्या आहेत, जे धोकादायक आहेत आणि त्यांच्यावर बंदी घातली आहे. जर आपल्या स्मार्टफोनमध्येही हे अॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. चला त्या अॅप्सची संपूर्ण यादी पाहूया .
 
पैसे चोरी गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आणि गुगलने सर्व 136 अॅप्सवर बंदी घातली. वापरकर्त्यांनी ते त्वरित त्यांच्या स्मार्टफोनमधून काढून टाकावे, कारण ग्रिफथोर्स अँड्रॉइड ट्रोजन धोकादायक आहे. Google प्रतिबंधित अॅप सूचीमध्ये हॅन्डी ट्रान्सलेटर प्रो, हार्ट रेट आणि पल्स ट्रॅकर, जिओस्पॉट: जीपीएस लोकेशन ट्रॅकर, आयकेअर - फाइंड लोकेशन, माय चॅट ट्रान्सलेटर समाविष्ट आहे.