बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (15:49 IST)

गुगल सांगणार स्पेलिंग चूका

आता इंग्रजीचं व्याकरण आणि स्पेलिंग चूका टाळण्यासाठी गूगलची नवीन सेवा सुरु करत आहे. नव्या ग्रामर टूलमुळे लिखाणातील चूका गूगल डॉक्युमेंटमध्ये निळया रेषेत दाखवल्या जाणार आहेत. हे अ‍ॅप्लिकेशन लवकरच विकसित केले जाणार आहे. 
 
पूर्ण डॉक्युमेंट टाईप केल्यानंतर युजरचा चूका दाखवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची अनुमती दिली जातील. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामर चेकर हा स्पेल चेकर आणि नॅचरल लॅग्वेज सर्च फीचरसोबत काम करणार आहे. त्यामुळे वेळेनुसार या टूलमध्येही  बदल केले जाणार आहेत. गूगलने केलेल्या घोषणेनुसार, सिस्को आणि जेनिसिससमवेत अनेक साथीदार कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच AI ची निर्मिती करणार आहे. जे कॉल सेंटरमध्ये लोकांऐवजी काम करणार आहेत. या सॉफ्टवेअरला 'कॉन्टेक्स सेंटर एआय' असे संबोधले जाते.