सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (21:37 IST)

व्हॉट्सअॅप वापरत असाल तर 5 गोष्टी नक्की जाणून घ्या, नाहीतर मोठ्या संकटात अडकाल

व्हॉट्सअॅप आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याशिवाय आता कदाचित कोणाला एक दिवसही काढणे कठीण आहे. पण व्हॉट्सअॅप वापरताना अनेक खबरदारी घेणे आजच्या काळात खूप महत्त्वाचे झाले आहे. ऑनलाइन घोटाळे आणि फसवणुकीत व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जात आहे, त्यामुळे आता आपले  व्हॉट्सअॅप खाते सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आज आम्ही व्हाट्सअँपशी निगडित काही गोष्टी सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण ऑनलाईन धोकाधडी पासून वाचू शकता. आपण आपल्या खासगी गोष्टी सामायिक होण्यापासून वाचवू शकता आणि स्वतःला तुरुंगात जाण्यापासून देखील वाचवू शकता. चला तर जाणून घ्या या गोष्टी .
 
1) प्रोफाईल फोटोमध्ये कधीही जास्त माहिती देऊ नका- 
कोणी तुमच्या संपर्कात आहे किंवा नाही, आपला प्रोफाईल फोटो प्रत्येकजण पाहू शकतो. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपवर आपला फोटो टाकताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही सोसायटीचे किंवा स्वतःच्या सोसायटीचे नाव दिसेल असा फोटो टाकणे टाळावे, तसेच ज्या कार किंवा बाईकमध्ये  कार-बाईकचा नंबर दिसत असेल त्यापुढे क्लिक केलेला फोटो टाकू नये. जेव्हा तुम्ही स्टेटस टाकता तेव्हा ते सर्वांसोबत शेअर करू नका, ते फक्त आपला मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा. कारण अशा अनेक लोकांचा नंबर आमच्या फोनमध्ये सेव्ह आहे ज्यांच्यासोबत स्टेटस शेअर करण्याची गरज नाही. 
 
2) कधीही अश्लील व्हिडिओ पाठवू नका, तुरुंगात जाऊ शकता-
व्हॉट्सअॅपवर अश्लील सामग्री शेअर केल्याने आपण अडचणीत येऊ शकता. जर कोणी व्हॉट्सअॅपवर आपल्या अकाउंटची तक्रार केली तर व्हॉट्सअॅप आपल्या अकाउंटवर बंदी आणू शकते आणि त्याच्या धोरणानुसार पोलिस तक्रार देखील करू शकते. अशा परिस्थितीत पॉर्न क्लिप पाठवणे आपल्याला तुरुंगात जाण्यास भाग पाडू शकते.
 
३) असे मेसेज फॉरवर्ड करू नका-
 आम्हाला व्हॉट्सअॅपवर अनेक प्रकारचे मेसेज येत राहतात. कोणतीही माहिती किंवा बातमी फॉरवर्ड करण्यापूर्वी ती फेक न्यूज नाही ना याची खात्री करा. यासोबतच फ्री ऑफर्स आणि सरकारी योजनांच्या नावाने अनेक बनावट लिंक फॉरवर्ड केल्या जातात. त्यांना फॉरवर्ड करणे टाळा. याशिवाय, कोणत्याही धर्म किंवा समुदायाविरुद्ध द्वेषयुक्त भाषणाचा प्रचार करणारे संदेश पाठवू नका. 
 
4) अनोळखी लोकांचा नंबर कधीही सेव्ह करू नका-
अनेक वेळा आपण कॅब, डिलिव्हरी बॉय किंवा कोणत्याही सर्व्हिस व्यक्तीचा नंबर सेव्ह करतो आणि नंतर डिलीट करायला विसरतो. अशा स्थितीत व्हॉट्सअॅपवर ती व्यक्ती आमच्या प्रोफाईल पिक्चरवरून आमचे स्टेटसही पाहते. अशा परिस्थितीत आमची अशी माहिती त्या लोकांपर्यंत जाते. म्हणूनच अनोळखी लोकांचा नंबर कधीही सेव्ह करू नका. 
 
5)  टू-स्टेप व्हेरिफिकेशन एक्टीव्हेट करा -
हे व्हॉट्सअॅपचे एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. टू-स्टेप व्हेरिफिकेशन द्वारे  आपल्याला  6-अंकी पिन सेट करावा लागेल. कोणत्याही नवीन डिव्‍हाइसवर आपल्या  नंबरवरून  व्हाट्सअँप वर लॉग इन करण्‍यासाठी हा पिन आवश्यक असेल. तसेच, ही पिन मध्यभागी देखील विचारली जाऊ शकते. सायबर फसवणुकीच्या या युगात व्हॉट्सअॅपचे टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय ठेवा.