मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (18:34 IST)

आता Whatsapp मधील सीक्रेट चॅट लपवणे झाले सोपे, करा या स्टेप्स फॉलो

WhatsApp मध्ये अनेक शानदार फीचर्स आहे. यातील काही फीचर्स तर तुम्हाला कदाचित माहित नसतील. या फीचर्समुळे चॅटिंग करणे सोप्पे होते. यूजर्सना आपल्या पर्सनल वॉट्सऍप चॅट लपवण्यासाठी थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करण्याची पण गरज नाही. वॉट्सऍप मधेच असे फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट सहज लपवू शकता.
 
तसेच या इन्स्टंट मेसेजिंग ऍप मध्ये आपल्या काही अश्या पर्सनल चॅट्स असतात ज्या इतरांनी वाचू नये असे आपल्याला वाटते. याचे उत्तर पण वॉट्सऍप मधेच आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आपले सीक्रेट चॅट डिलीट न करता Whatsapp चॅट लपवू शकतात. हे फीचर अनेकांना माहित असते पण वापर खूप कमी लोक करतात.
 
अशी आहे ट्रिक:
आम्ही तुम्हाला वॉट्सऍप मध्ये ज्या फीचरचा वापर करण्यास सांगत आहोत त्याचे नाव आहे Archive चॅट्स. या फीचरच्या मदतीने तुम्ही वॉट्सऍप चॅट मेन स्क्रीन वरून बाजूला काढू शकता. तसेच असे केल्यावर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा ती चॅट पुन्हा परत आणू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही ग्रुप आणि पर्सनल दोन्ही चॅट लपवू (how to hide whatsapp chat in android phone)शकता.
1. सर्वात आधी जी चॅट लपवायची आहे त्यावर थोडावेळ टच करून ठेवा.
2. वर तुम्हाला तीन पर्याय दिसतील ज्यात चॅट पिन, म्यूट आणि आर्काइव असेल. यातील शेवटचा Archive पर्याय निवडा.
3. या ऑप्शन वर टॅप करताच चॅट होम स्क्रीन वरून गायब होईल.
अश्याप्रकारे परत आणा चॅट
1. Archive चॅट्स स्क्रीनच्या खाली दिसेल. स्क्रोल करत सर्वात खाली जा.
2. इथे तुम्हाला Archived चा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
3. टॅप केल्यानंतर Unarchiveचा ऑप्शन दिसेल, ज्या नंतर चॅट परत स्क्रीन वर येईल.