शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (09:36 IST)

श्री गणेशाला २१ चं दुर्वा का वाहाव्यात ?

२१ चं का तर त्याचे स्पष्टीकरण:
प्रथम दुर्वा या शब्दाचा अर्थ बघू
" दुःखांना वारते ( दूर करते ) ती दुर्वा "
 
आता संसारात दुःख का आहे  ?
तर त्या मागे षड्रिपू आहेत 
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे षड्रिपू दुःखाला कारण होतात. 

कसे तर प्रपंचामुळे. 
प्रपंच म्हणजे :-
१.  ५ ज्ञानेंद्रिय
२.  ५ कर्मेंद्रिय
३.  ५ तन्मात्रा
४.  ५ महाभूते
५.  ५ प्राण
 
यामागे काय असते तर
अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार
 
या चतुष्टयाचे मागे असतात तीन गुण
सत्व, रज, तम.
 
या तीन गुणांच्या मागे असते
द्वैत म्हणजे मूळ माया आणि परब्रह्म आणि त्यामागे असते अद्वैत म्हणजे श्री गणेश.
 
आता आपण हे सर्व मोजू
६ षड्रिपू
५ प्रपंच
४ चतुष्टय
३ गुण
२ द्वैत
 
या सर्वांची बेरीज २० होते व शेवटी राहतो १ तो अद्वैत. म्हणजे श्री गणेश. अशा २१ दुर्वा वहाव्यात. 
 
यातील २० जे दुःखाला कारणीभूत आहेत ते दुर करण्यासाठी एक अद्वैताला. अशा २१ दुर्वा श्री गणेशाला अर्पण कराव्यात. 
 
नैवेद्य दाखवून झाला की एक मोदक आपण गणपतीला ठेवतो व बाकी प्रसाद म्हणून वितरीत करतो. 
 
अद्वैतातुन जन्म झाल्यावर आपण द्वैतात येतो आणि परब्रह्मापासून दूर होऊन मायेच्या प्रभावात येतो. त्यामुळे तीन गुण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुष्टय, आणि पंच सकार म्हणजे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्रा, महाभूते, व प्राण (प्रत्येकी पाच) आणि षड्रिपू असा २० चा समूह - आपल्या मूळ स्वरूपावर आरूढ होतात व कर्मफल सिद्धांतानुसार आपण आपले मूळ स्वरूप विसरुन जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो. त्यातुन बाहेर पडण्यासाठी श्री गणेश उपासना आहे. असा २१ या संख्येचा अर्थ आहे.
 
म्हणून गणेशाला २१ दुर्वा वाहाव्यात जेणे करून गणेश क्रुपेने जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्ष लाभुन अंती स्वानंद प्राप्त होवो.