शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:26 IST)

‘नमो’ अ‍ॅपचे नवे व्हर्जन सादर, आणखी काही फीचर्स जोडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवसाच्या आधी ‘नमो’ अ‍ॅपचे नवे व्हर्जन सादर करण्यात आले आहे. नव्या व्हर्जनद्वारे या अ‍ॅपमध्ये आणखी काही फीचर्स जोडण्यात आलेले आहेत. वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी अ‍ॅपचे नवे व्हर्जन आणल्या गेले आहे.
 
पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती देताना म्हटले आहे की, नमो अ‍ॅपला नवे अपडेट! हे आता पुर्वीपेक्षा अधिक जलद आणि सोपे आहे. सोप्या पद्धतीने विशेष मजकूर आपण मिळवू शकतो. आपल्या चर्चेला अधिक चांगली बनवण्यासाठी, नव्या व्हर्जनचा स्वीकार करूयात.
 
अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये वन-टच नेव्हिगेशन, ‘नमो एक्‍सक्‍लुझिव्ह’ या नव्या सेक्शनसह वापरकर्त्यांच्या आवडीनुसार मजकूराचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. विविध भागांमधील मजकूर पाहण्यासाठी आता वापरकर्त्यांना केवळ एकदाच स्लाईड फिरवावी लागणार आहे. आतापर्यंत हे अ‍ॅप दीड कोटींपेक्षा अधिक जणांनी डाउनलोड केलेले आहे. या अ‍ॅपद्वारे वापरकरकर्त्यास थेट पंतप्रधान मोदींकडूनही मेसेज येऊ शकतो.