गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (08:32 IST)

‘या’ सात शहरांमध्ये जिओची 5G सेवा सुरू

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे. शिवाय देशातील 22 राज्यातील अंदाजे 102 शहरांमध्येही आजपासून जिओ सुरु झाले आहे. 5G नेटवर्क सुरु करण्यात जिओ आघाडी आहे. अशातच कंपनीने अद्याप व्यावसायिक पातळीवर जिओची सुरुवात केलेली नाही.
 
जिओ 5G सेवा पूर्ण सक्षमतेने सर्व यूजर्ससाठी कार्यन्वित झालेली नाही. त्याऐवजी, या शहरांमधील जिओ वापरकर्त्यांना जिओ 5Gसाठी आमंत्रण मिळणार आहे. त्यामध्ये जिओ स्वागत ऑफर, कनेक्ट करण्यासाठी आणि 1 जीबीपीएसपर्यंत अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी, कोणत्याही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
 
दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी येथून देशात 5G सेवा सुरू करण्यात आली. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात ही 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनीचे चेअरमन आकाश अंबानी यांनी पत्नीसह नाथद्वारात श्रीनाथजींची पूजा केली. त्यानंतर मोती महलमध्ये आयोजित लाँचिंग कार्यक्रमात टॅबलेटचे बटण दाबून सेवा सुरू केली.
Edited by: Ratnadeep Ranshoor