गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : बुधवार, 13 जानेवारी 2021 (23:06 IST)

वर्क फ्रॉम होम साठी लॅपटॉप घेताना या 6 गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना व्हायरस मुळे सध्या लोक घरातच काम करत आहे. वर्क फ्रॉम होम करताना लॅपटॉप अत्यंत महत्त्वाचा ठरतो. प्रकल्प असो किंवा ऑफिसचे इतर काम असो, लॅपटॉप शिवाय काम पूर्ण होत नाही. जर आपण देखील घरातूनच काम करत आहात आणि लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करीत आहात तर आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा आपण काही ही फीचर्स ना बघता चुकीचे लॅपटॉप विकत घेतो आणि त्याचा त्रास नंतर सहन करावा लागतो. लॅपटॉप मनाप्रमाणे काम करत नसल्यास अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत लॅपटॉप विकत घेताना या 6 गोष्टींकडे लक्ष द्यावे.

1 सर्वप्रथम बजेट आखा -
बाजारपेठेत वेगवेगळ्या किमतीचे लॅपटॉप उपलब्ध असतात परंतु सर्वप्रथम आपल्याला आपले बजेट ठरवावे की आपल्याला ह्या किमतीच्या आसपासच लॅपटॉप विकत घ्यायचा आहे. बऱ्याचवेळा योग्य बजेट नसल्यामुळे योग्य लॅपटॉप निवडण्यात अडचणीचा सामना करावा लागतो.या साठी आपण बजेट निश्चित करा.

2 ऑपरेटिंग सिस्टम -
लॅपटॉप खरेदी करताना हे लक्षात ठेवा की लॅपटॉप मध्ये जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ते कामासाठी  योग्य आहे किंवा नाही. बऱ्याच वेळा घाई गडबडीत चुकीचे ऑपरेटिंग सिस्टम विकत घेतो. सध्या बाजारपेठेत मायक्रोसॉफ्टचे विंडो 7 ,विंडोज 8 ,विंडोज 10 च्या व्यतिरिक्त बरेच ऑपरेटिंग सिस्टम वाले लॅपटॉप सहज मिळतात जर आपण नवीन लॅपटॉप खरेदी करायला जात असाल तर हे लक्षात ठेवा.

3 बॅटरीचे दीर्घायुष्य -
ऑपरेटिंग सिस्टम नंतर, लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप अवश्य बघा. बऱ्याच वेळा लॅपटॉप योग्य दिसतो पण त्याची बॅटरी जास्त वेळ चालत नाही. लॅपटॉप घेण्याच्या पूर्वी हे बघून घ्या की लॅपटॉपची बॅटरी किती MAH (एमएएच) ची आहे. बॅटरी जेवढ्या जास्त MAH (एमएएच) ची असेल लॅपटॉप तेवढेच जास्त वेळ काम करत.  

4 लॅपटॉपचे डिस्प्ले –
बऱ्याच लोकांना लहान स्क्रीन साइजचे लॅपटॉप आवडतात.तर काही लोकांना मोठ्या स्क्रीनचे लॅपटॉप आवडतात. आपण आपल्या आवडीनुसार लॅपटॉपच्या स्क्रीनची निवड करू शकता. आम्ही सांगू इच्छितो की बहुतेक लोक 15 इंच स्क्रीन असलेले लॅपटॉप पसंत करतात. कारण हे कॅरी करणे सोपे असतात.

5 योग्य रॅम आणि प्रोसेसर-
लॅपटॉप मध्ये जेवढे अधिक रॅम आणि योग्य प्रोसेसर असेल लॅपटॉप तेवढे चांगले काम करेल. आपण लॅपटॉप खरेदी करताना हे आवर्जून बघावं. जर लॅपटॉपचे रॅम आणि प्रोसेसर व्यवस्थित आहे तर आपण कार्यानुसार कोणतेही सॉफ्टवेयर घालू शकता. असे बरेच सॉफ्टवेअर असतात जे लॅपटॉप मध्ये कमी रॅम असल्यामुळे योग्यरीत्या काम करत नाही.

6 लॅपटॉपचा की बोर्ड –
जर आपल्याला लॅपटॉपवर जास्त काम करावयाचे आहे तर लॅपटॉप विकत घेताना एकदा की बोर्ड तपासा. बरेच लोक लॅपटॉपमध्ये सॉलिड की बोर्ड पसंत करतात. लॅपटॉप घेताना एकदा की बोर्ड वर टायपिंग करून बघावं. पुढच्या वेळी लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.