बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (15:12 IST)

Google drive चा योग्य वापर करायला शिका

इंटरनेट अशी सुविधा आहे जी सध्याच्या काळासाठी खूपच उपयुक्त आहे. आपण असं देखील म्हणू शकतो की या मुळे आपले जीवन सोपे आणि सहज झाले आहे. इंटरनेटचा वापर करणारे लोकं गूगल ला असेच गूगल देव म्हणत नाही. हे आपल्याला एकापेक्षा अधिक उपयुक्त साधने विनामूल्य देतं.
 
 सुरुवातीच्या वापरकर्त्यांना ज्यांना गूगलने दिलेली सुविधा मर्यादित वापरायची असते, त्यासाठी त्यांना काहीही पैशे द्यायचे नसते. होय, जेव्हा आपण इंटरप्राइझ स्तरावर जाता आणि त्यांच्या उत्पादनाचा एका मर्यादेनंतर व्यावसायिक रूपाने वापर करता तर त्या परिस्थितीत कंपनी आपल्यापुढे बरेच पर्याय ठेवते. 
 
तथापि, आज आम्ही या लेखात फक्त google च्या इतर सेवां बद्दल न बोलता केवळ google drive बद्दल बोलू या. हे आपल्यासाठी google ने दिलेली जणू भेटच आहे, ज्याला ऑनलाईन काम करणारे अमृत मानतात. 
 
सोप्या भाषेत, आपण त्यास आपल्या बँकेचे लॉकर मानू शकता, वापर करायला हे सुलभ तर आहेच याची सुरक्षा लॉकर पेक्षा कमी नाही. 
 
आपणास सर्वांना हे माहिती आहे की हे आपल्या जीमेल शी जोडलेले असते. जेव्हा देखील आपण जीमेलला लॉग इन करता, तर त्याच लॉगिनच्या साहाय्याने आपण ड्राइव्हला देखील ऍक्सेस करू शकता.
 
गूगल ड्राइव्ह मध्ये आपण केवळ आपले इच्छित फोटो, व्हिडिओ किंवा अन्य महत्त्वाचे कागदपत्रे वेगवेगळ्या फोल्डर मध्ये ठेवू शकता, किंवा गरज पडल्यास आपण लिंक शेयरिंगच्या माध्यमाने एखाद्या व्यक्तीला किंवा अधिक लोकांना संबंधित दस्तऐवजाचे ऍक्सेस देखील देऊ शकता.
 
आपणास असं वाटत असल्यास की जीमेल चा वापर न करतातच कोणी तरी आपले कागदपत्र बघू शकेल किंवा डाउनलोड करू शकेल, तर त्यासाठी एक मार्ग आहे. तथापि सुरक्षेच्या दृष्टीने हे सुरक्षित नाही. 
 
चला जाणून घेऊ या की google ड्राइव्ह चा वापर आपण कसा करू शकतो.
 
 
 
सर्वप्रथम आपण कॉम्प्युटर मध्ये जीमेल लॉग इन करा आपल्याला ब्राउझर मध्ये उजव्या बाजूस google अ‍ॅप्स संकलनाचे आयकॉन दिसेल. त्याला क्लिक केल्यावर, google च्या सर्व सेवा आणि प्रॉडक्ट दिसू लागतील, जसे गूगल कॅलेंडर, यूट्यूब, गूगलकीप इत्यादी. याच आयकॉन मध्ये आपल्याला ड्राइव्ह चे आयकॉन दिसेल ज्याला आपल्याला क्लिक करावयाचे आहे.
 
 
 
हे आपण थेट या लिंकच्या माध्यमाने देखील उघडू शकता. http://drive.google.com/ 
 
आपण ही लिंक उघडतातच आपल्याला डाव्या बाजूस ड्राइव्ह चे मेनू दिसू लागतील, या मध्ये माय ड्राइव्ह आणि शेयर्ड विद मी च्या व्यतिरिक्त इतर काही आयकॉन दिसतील.
 
 
 
माय ड्राइव्ह मध्ये आपण आपल्या हिशोबाने वेगवेगळे फोल्डर्स तयार करू शकता, जसे की आपण आपल्या कॉम्प्युटर मध्ये करता. बरेच लोकं अजाणता फोल्डर आणि फाइल यादृच्छिकरित्या अपलोड करतात आणि नंतर काही शोधायचे असेल तेव्हा अस्वस्थ होतात. त्यात शोध पर्याय असले तरी ही, 
तांत्रिक तज्ज्ञ सूचित करतात की आपण आपल्या गरजेनुसार फोल्डर आणि सब-फोल्डर तयार करा आणि त्यानुसार फाइल्स ड्राइव्ह मध्ये जतन करा.
 
 
 
आपण सुरुवाती पासूनच जेवढ्या चांगल्या पद्धतीने फाइल्सचे जतन कराल, तेवढेच आपले गोंधळ कमी होतील आणि आपण याचा वापर करण्यासाठी देखील प्रवृत्त व्हाल.
 
 
 
त्याच प्रमाणे 'शेयर्ड विद मी' लिंक वर आपल्याला त्या फाइल्स/फोल्डर्स चे ऍक्सेस देखील मिळतात, जी आपण दुसऱ्यांच्या सह सामायिक केली असते. 
साधारणपणे इथे फाइल्स पसरलेल्या असतात, पण वैशिष्ट्यं असं की आपण याचे जतन देखील करू शकता. 
 
या साठी आपल्याला सामायिक केलेल्या फाइल्स वर राईट क्लिक करावयाचे असते आणि दिलेल्या पर्यायांमध्ये Move to चा वापर करावयाचा असतो.
 जर हे कार्य करत नसेल तर राईट क्लिक करूनच Add Shortcut to Drive ऑप्शन दिसतो. याचा वापर करून आपल्याला सामायिक केलेल्या फाइल्सला जतन करण्यात मदत करतो.
 
 
 
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाइल शेअरिंग !
 
या साठी आपल्याला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि दिलेल्या पर्यायाला समजून घेण्याची गरज आहे.
 
 
 
सर्वप्रथम आपल्याला गूगल ड्राइव्ह मधून जी फाइल शेअर करायची आहे त्या वर राईट क्लिक करावे. नंतर दिलेल्या पर्यायामध्ये शेअर पर्यायावर क्लिक करा. आपल्या समोर एक पॉपअप उघडेल, ज्या मध्ये 'Share with people and groups'!  लिहिलेलं असेल.
 
 या मध्ये आपण एखाद्या व्यक्तीचे ईमेल टाईप करून त्यावर फाइल शेयर करू शकता, तर त्याला व्यूअर, कमेंन्टर किंवा एडिटरचे अधिकार देखील देऊ शकता. एवढेच नव्हे तर त्याला विशिष्ट फाइल/फोल्डर चे मालक देखील बनवू शकता.
 
 
 
जर आपल्याला ईमेल च्या शिवाय लिंक शेअर करावयाचे असल्यास तर आपण याच पॉपअप मध्ये Get link चे ऑप्शन देखील बघू शकता. या साठी आपण आपल्या आवश्यकतेनुसार सेटिंग करू शकता.
 
 मग ते आपले गूगल डॉक्स असो, गूगलशीट्स असो, आपण गूगल ड्राइव्ह मध्ये पर्टिक्युलर फोल्डर वाईज गूगलच्या या सेवांना देखील व्यवस्थित ठेवू शकता आणि आपल्या सोयीनुसार त्यांचा वापर देखील करू शकता किंवा दुसऱ्यांना सोयीप्रमाणे ऍक्सेस देऊ शकता.
 
 
 
क्लाउड स्टोरेजसाठी गूगल ड्राइव्ह च्या व्यतिरिक्त मीडिया फायर,पी क्लाउड , मायक्रोसॉफ्टची वन ड्राइव्ह, सिंक अमेजन ड्राइव्ह, अँपल चे आई क्लाउड इत्यादी असतात,पण गूगल ड्राइव्ह तर अखेर गूगल ड्राइव्ह आहे. जर आपण क्लाउड स्टोरेजसाठी गूगल ड्राइव्ह चा वापर केला आहे किंवा करणार आहात तर नक्कीच हे आपल्याला एक अमृताची अनुभूती देणार आणि आपण देखील म्हणाल वा 'गूगल ड्राइव्ह वा !