रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (15:42 IST)

फेसबूकमुळे भारतातील निवडणुका प्रभावित होणार नाही : झुकरबर्ग

फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग कँब्रिज अनॉलिटीक डेटा लीक प्रकरणात यूएस काँग्रेस समोर हजर झाला. त्याने विश्वास दिला की भारतात होणाऱ्या आगामी निवडणुका फेसबूकच्या माध्यमातून प्रभावित नाही होऊ देणार. यूएस काँग्रेस समोर झुकरबर्गने माफी मागितली. 'फेसबूकला मी बनवलं आणि मीच त्याला चालवतो. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा' असं देखील त्याने म्हटलं. 

झुकरबर्गने म्हटलं की २०१८ हे महत्त्वाचं वर्ष आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. सोबतच भारत, पाकिस्तान, ब्राझील सारख्या देशांमध्ये देखील निवडणुका होणार आहेत. मी विश्वास देतो की निवडणुकीवर फेसबुकचा काहीही परिणाम होणार आहे. झुकरबर्गने 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबतीत एक पोस्ट लिहिली होती. त्याने म्हटलं की, या प्रकरणात अनेक पाऊलं उचलली गेली आणि यापुढे ही पाऊलं उचलली जातील असे सांगितले.