रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

झुकेरबर्गला कन्यारत्न, दाम्‍पत्‍याने नाव ठेवल 'ऑगस्ट'

फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या दाम्‍पत्‍याने आपल्‍या मुलीचे नाव ऑगस्ट असे ठेवलं आहे.  फेसबुक पोस्टद्वारे झुकेरबर्गने आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली आहे. त्यासोबत दोघांनी ऑगस्टसाठी तिनशे शब्दांचा समावेश असलेले पत्रही लिहिले आहे. 
 
फेसबुकवर झुकेरबर्गने पत्नी आणि दोन मुलीसह फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर आपल्या मुलीसाठी त्याने एक पोस्टही लिहली आहे. 'प्रिय ऑगस्ट, तुझी आई आणि मला इतका आनंद झाला आहे की, तो व्‍यक्‍त करण्‍यासाठी आमच्‍याकडे शब्‍द नाहीत.  ज्यावेळी तूझ्या मोठ्या बहिनीचा जन्म झाला होता तेव्हा आम्ही जगासाठी पत्र लिहले होतं. ऑगस्ट, तू एका अशा जगात जन्माला आली आहे. जिथे तूला उत्कृष्ट शिक्षण मिळेल. समानता असेल. रोगराईला कोणताही थारा नसेल. कौशल्य विकास आणि समानतेला प्रोत्साहन यावरच तुमच्या पिढीचा भर असावा, सर्वांना शिक्षण मिळावे, रोगांचे उच्चाटन व्हावे, लोक आपापसांत जोडले जावेत आणि सशक्त समाज उभा राहावा, असे आम्हाला वाटते असे म्हटले आहे.