बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (08:08 IST)

भारतात मेटा ने व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी Llama-3 AI लाँच केले

Meta AI
सोशल मीडिया ग्रुप मेटाने व्हॉट्सॲप, फेसबुक, मेसेंजर आणि इंस्टाग्रामसह सर्व प्लॅटफॉर्मवर प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) असिस्टंट लामा-3 मॉडेल लॉन्च केले आहे.

मेटाने भारतीय वापरकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना केली आहे. मेटा ने लामा-3 मॉडेल सादर केले असून विविध डिजिटल संवादादरम्यान वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्याचा दावा केला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये कनेक्ट कॉन्फरन्समध्ये हे पहिल्यांदा दाखवण्यात आले होते. यानंतर, मेटा एआय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा सारख्या निवडक देशांमध्ये सादर करण्यात आला.

या देशांमध्ये यशस्वी चाचणी टप्प्यांनंतर एप्रिलमध्ये भारतातील निवडक वापरकर्त्यांसोबत एआय असिस्टंटची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे सर्व एआय मॉडेल्सचे लाँचिंग थांबवण्यात आले होते. मेटा AI चे Llama-3 मॉडेल हे  गूगल चे जेमिनी आणिओपन एआई चे चॅटजीपीटी  सारखे चॅटबॉट आहे, जे वापरकर्त्यांना दैनंदिन कामात मदत करते. ईमेल ड्राफ्ट, रेझ्युमे इत्यादी सर्व कामे देखील मेटा च्या AI असिस्टंटद्वारे करता येतात. याव्यतिरिक्त, मेटा चे AI सहाय्यकमेटाच्या विविध ॲप्समध्ये सहजपणे कार्य करते.
Edited by - Priya Dixit