रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

Jio GigaFiber ची नवीन सेवा लाँच, आता अर्ध्या किमतीत मिळेल कनेक्शन

आपल्याला असं वाटतं असेल की जर रिलायंस जिओचे गीगाफायबर कनेक्शन आपल्याला स्वस्त मिळावे तर आपल्यासाठी खुशखबरी आहे. रिलायंस जिओने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जिओ गीगाफायबरचा नवीन व्हर्जन प्रस्तुत केलं आहे. 
 
जियो आपलं नवीन गीगाफायबर ब्रॉडबँड कनेक्शन जुन्या कनेक्शनच्या तुलनेत 2,000 रुपये कमीत देत आहे. तर जाणून घ्या नवीन किंमत आणि ऑफर्सबद्दल...
 
रिलायंस जियो गीगाफायबर कनेक्शन देण्यापूर्वी ग्राहकांना सिक्योरिटी म्हणून 4,500 रुपये घेत होता परंतू कंपनीने नवीन सेवा अंतर्गत सिक्योरिटी डिपॉजिट कमी करुन केवळ 2,500 रुपये केले आहे.
 
तथापि जिओ गीगाफायबरचं नवीन व्हर्जन कमी स्पीडसह येणार. या कनेक्शनसह आपल्याला सिंगल बँडला सपोर्ट करणारं वाय-फाय राउटर मिळेल. अशात आपल्याला 100 एमबीपीएस ऐवजी 50 एमबीपीएसची स्पीड मिळेल. असा दावा एका यूजरने केला असून कंपनीने नवीन कनेक्शनबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
 
तसं तर Jio GigaFiber अजून अधिकृत रीत्या लाँच झालेले नाही तरी देशभरातील अनेक शहरांमध्ये याची टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग म्हणून ग्राहकांना जिओ गीगाफायबर कनेक्शन दिले जात आहे. आता पर्यंत हे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना 4,500 रुपये सिक्योरिटी म्हणून द्यावे लागायचे तर आता केवळ 2,500 रुपये द्यावे लागतील. तसं तर ही रक्कम देखील नंतर वापस मिळेल.
 
जिओ गीगाफायबरच्या पहिल्या ऑफरसोबत डुअल बँड कनेक्टिविटी मिळत होती ज्यात फ्रीक्वेंसी 2.4GHz-5GHz होती. यात आपल्याला 100 एमबीपीएस पर्यंत स्पीड मिळत होती. नवीन कनेक्शनमध्ये ग्राहकांना एकूण 1100 जीबी मासिक डेटा मिळेल.