शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जून 2019 (17:38 IST)

Instagram चालविण्यावर आता आपला डेटा खर्च होणार नाही, आलं नवीन फीचर

इंस्टाग्रामने एक नवीन फीचर ‘ऑप्ट-इन’ सादर केलं आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या अॅप वापरामध्ये इंटरनेट डेटा कमी खर्च होईल. कंपनीने एका वक्तव्यात म्हटलं आहे की या फीचरला खास करून त्या बाजारांना लक्षात ठेवून डिझाइन केलं आहे, जेथे मोबाइल इंटरनेट डेटा योजना सीमित आहे किंवा त्यांची गती खूप मंद आहे.
 
वक्तव्यानुसार हे वापरकर्त्यांना Instagram वर उच्च दर्जाच्या कंटेंटला वाय-फाय किंवा मोबाइल डेटा पैकी कोणत्याही एकावर पाहण्यासाठी पर्याय प्रदान करेल. जर एखादा वापरकर्ता 'वाय-फाय' पर्याय निवडत असेल तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि हाय-रिझोल्यूशन फोटो आपोआप लोड होणार नाहीत. वापरकर्त्याच्या निवडीवर, ते फोनवर लोड केलं जाईल. 
 
तथापि जगभरातील लोक सामान्य गुणवत्तेमध्ये हे कंटेंट Instagram वर पाहू शकतील, कारण फोटो लोड होण्याची वेळ कमी होईल आणि यामुळे मोबाइल फोन डेटा देखील कमी खर्च होईल. डेटा बचतच्या या फीचरमुळे कमी इंटरनेट गती असलेल्या क्षेत्रात, निर्बंध Instagram चा वापर करू शकता येतील. आठवड्याभरात हे फीचर Android वापरकर्त्यासाठी जगभरात उपलब्ध होईल.