शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

#JCBKiKhudai नंतर आता सनी लिओनीचा नवीन व्हिडिओ व्हायरल

अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने जेसीबीवर उभं राहून फोटोशूट करवले होते, बघता-बघता या पोस्टमुळे सोशल मीडियावर खूप धमाल केली. हा फोटोशूट #JCBKiKhudai या नावाने खूप ट्रेंड झाला होता. आता सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की याला आता पर्यंत लाखो लोकं बघून चुकले आहे.
 
सनी लिओनीने हा व्हिडिओ स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात तिच्यासोबत एमटीव्ही रोडीज स्टार रणविजय दिसत आहे. हा व्हिडिओ जयपुरमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत सनीने लिहिले की, 'मी रणला खूप विंनती केली की मला या स्टंटचा भाग व्हायचं आणि एका चांगल्या भावाप्रमाणे तो मला वाचवण्यासाठी उभा राहिला. धन्यवाद  रणविजय। लक्ष्य तू मारलसं! काही मिनिटांसाठी निशाचं हेल्मेट चोरलं होतं, कारण सुरक्षा सर्वात आधी.'