1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (11:41 IST)

व्हाट्सएपवर देण्यात येणार्‍या धमक्या किंवा अश्लील संदेशांवर सरकार करेल कारवाई

केंद्र सरकारने व्हाट्सएपवर आपत्तीजनक संदेश आणि धोक्याची तक्रार दूरसंचार विभागात नोंदणी करण्याची सुविधा सुरू केली आहे. पीडितांना तक्रार करण्यासाठी मोबाइल नंबरसह संदेशाचा स्क्रीनशॉट घेणे आवश्यक आहे. दूरसंचार विभागाची हेल्पलाइनवर जारी केलेल्या ई-मेलवर पाठवावे. त्यानंतर विभाग त्यावर कारवाई करेल. चला जाणून घेऊ.
 
पुलवामा हल्ल्यानंतर बर्‍याच लोकांना व्हाट्सएपवर अपमानकारक संदेश आणि धमक्या देण्यात आल्या आहेत.  विभागाने हेल्पलाइन म्हणून ई-मेल आयडी [email protected] तयार केले. जर कोणाला अपमानकारक, आपत्तीजनक, धमक्या किंवा अश्लील संदेश मिळत असतील तर मोबाइल नंबरासह संदेशाचा स्क्रीनशॉट घेऊन यावर पाठवावे. 
 
विभागाचे कम्युनिकेशंस कंट्रोलर आशिष जोशी यांनी ट्विट केले की आम्ही त्वरित कारवाईसाठी दूरसंचार कंपन्या आणि पोलिस प्रमुखांशी चर्चा करू. सूचना व प्रौद्योगिकी मंत्रालयाकडून मॉब लिंचिंगच्या समस्येवर बर्‍याच वेळा संदेशांवर नियंत्रण ठेवण्याची बाब करण्यात आली होती पण दूरसंचार विभागाने हेल्पलाइन म्हणून ई-मेल आयडी जारी करून नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत नाव कमावले आहे. 
 
केंद्रीय सूचना प्रौद्योगिकी मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले डिजिटलीकरण आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरादरम्यान भारताला डिजीटल प्लॅटफॉर्मची सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.