सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (09:55 IST)

शेकडो बेरोजगार तरुणांनी पाठवला पंतप्रधान यांना बायोडाटा

सन २०१४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्या प्रत्येक भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रति वर्षाला दोन कोटी बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज रोजीपर्यंत ६.६० कोटी तरुण बेरोजगार असल्याचे चित्र संपूर्ण भारतात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शेकडो तरुण-तरुणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाडच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली आपले बायोडाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. दरम्यान, बेरोजगारीची आकडेवारी उघडकीस येईल म्हणून तो अहवालच दडपण्याचे आदेश या मोदींनी दिलेले आहेत. यावरुन मोदी हे किती डरपोक पंतप्रधान आहेत, हेच सिद्ध होत आहे, अशी टीका आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.